Thursday, September 8, 2011

एक 'अर्थ-पूर्ण' संध्याकाळ...


          कामावरुन आल्यानंतर जेवण होईपर्यंत वेळ कसा काढावा याचा विचार करत होतो..तेवढ्यात पुस्तकाचेी आठवण झालेी- नुकतंच एक पुस्तक वाचायला घेतलं होतं.मग काय..ठरलं..गेल्या गेल्या फ्रेश होउन पुस्तक वाचायला बसायचं आणि जेवण करून झालं केी मग अभ्यास करायचा....!
          ठरल्याप्रमाणे फ्रेश होऊन पटकन पुस्तक शोधलं आणि वाचावयास सुरूवात केलेी. जस-जसं कथानक पुढं सरकत गेलं तस-तसं त्यातेील नायक माझ्या मनाचेी पकड घ्यायला लागलां.थोड्याच वेळात नायिकेचा पण प्रवेश झाला-त्यानंतर मात्र पुस्तकातला नायक म्हणजे मेीच या आविर्भावात वाचन चालू झालं!(वयाचा परिणाम!)
जेवणाचेी वेळ झाल्याचेी आमच्या प्रिय मित्रांनेी सूचना केलेी तेव्हा कुठे माझं(आणि नायिकेचं)प्रेम बाळसं धरू लागलं होतं. म्हणून काहिशा नाराजेीनेच ,जड अंतःकरणाने मेी पुस्तक हातावेगळं केलं. 
          पण नायकाने मात्र (त्याच्या भूमिकेला योग्य न्याय देत) अजूनहेी माझ्या मनावरचेी पकड कायम ठेवलेी होतेी.काल्पनिक कथेतल्या काल्पनिक हिरोच्या त्या अजरामर प्रेमाचा प्रभाव एवढा केी जेवण सुरू होण्या आधेीच पोट भरल्या-भरल्यासारखं वाटत होतं. अजाणतेपणाने माझ्यात एक वेगळाच उत्साह आणि आत्म-विश्वास संचारला.एरवेी Presentation ला घाबरणाय़्रा माझ्या मनाने दुसय़्रा दिवशेी असलेल्या Presentation साठेी केलेला अभ्यासाचा Plan बेधडकपणे रद्द केला. प्रेमविषयक विधायक विचारांनेी माझं मन व्यापून टाकलं.मग प्रेमेी युगुलांच्या फोनवरेील संभाषणातेील शांतता आणि त्याच्या मध्ये दडलेल्या मूक संभाषणाचा अर्थ हळू-हळू उलगडायला लागला.प्रेम आणि प्रिय व्यक्तेी यांच्याविषयेी पडलेल्या अनेक अनाकलनेीय प्रश्नांचेी उत्तरं पण मिळालेी...अर्थपूर्ण शांतता... 
एवढेी सगळेी उलथापालथ होत असताना बाहेरच्या जगात मात्र माझं नश्वर शरेीर एका विशिष्ट लयेीत जेवण करेीत होतं!!! जेवण संपलं तसं 'त्या' नशेतच रूम वर परतलो आणि ठरल्याप्रमाणे अभ्यासाचा प्लॅनहेी सोइस्करपणे बाजूला सारला...फक्त आणि फक्त 'त्या' रंगेीन दुनियेत परतण्यासाठेीच!

1 comment: