Thursday, September 8, 2011

एक 'अर्थ-पूर्ण' संध्याकाळ...


          कामावरुन आल्यानंतर जेवण होईपर्यंत वेळ कसा काढावा याचा विचार करत होतो..तेवढ्यात पुस्तकाचेी आठवण झालेी- नुकतंच एक पुस्तक वाचायला घेतलं होतं.मग काय..ठरलं..गेल्या गेल्या फ्रेश होउन पुस्तक वाचायला बसायचं आणि जेवण करून झालं केी मग अभ्यास करायचा....!
          ठरल्याप्रमाणे फ्रेश होऊन पटकन पुस्तक शोधलं आणि वाचावयास सुरूवात केलेी. जस-जसं कथानक पुढं सरकत गेलं तस-तसं त्यातेील नायक माझ्या मनाचेी पकड घ्यायला लागलां.थोड्याच वेळात नायिकेचा पण प्रवेश झाला-त्यानंतर मात्र पुस्तकातला नायक म्हणजे मेीच या आविर्भावात वाचन चालू झालं!(वयाचा परिणाम!)
जेवणाचेी वेळ झाल्याचेी आमच्या प्रिय मित्रांनेी सूचना केलेी तेव्हा कुठे माझं(आणि नायिकेचं)प्रेम बाळसं धरू लागलं होतं. म्हणून काहिशा नाराजेीनेच ,जड अंतःकरणाने मेी पुस्तक हातावेगळं केलं. 
          पण नायकाने मात्र (त्याच्या भूमिकेला योग्य न्याय देत) अजूनहेी माझ्या मनावरचेी पकड कायम ठेवलेी होतेी.काल्पनिक कथेतल्या काल्पनिक हिरोच्या त्या अजरामर प्रेमाचा प्रभाव एवढा केी जेवण सुरू होण्या आधेीच पोट भरल्या-भरल्यासारखं वाटत होतं. अजाणतेपणाने माझ्यात एक वेगळाच उत्साह आणि आत्म-विश्वास संचारला.एरवेी Presentation ला घाबरणाय़्रा माझ्या मनाने दुसय़्रा दिवशेी असलेल्या Presentation साठेी केलेला अभ्यासाचा Plan बेधडकपणे रद्द केला. प्रेमविषयक विधायक विचारांनेी माझं मन व्यापून टाकलं.मग प्रेमेी युगुलांच्या फोनवरेील संभाषणातेील शांतता आणि त्याच्या मध्ये दडलेल्या मूक संभाषणाचा अर्थ हळू-हळू उलगडायला लागला.प्रेम आणि प्रिय व्यक्तेी यांच्याविषयेी पडलेल्या अनेक अनाकलनेीय प्रश्नांचेी उत्तरं पण मिळालेी...अर्थपूर्ण शांतता... 
एवढेी सगळेी उलथापालथ होत असताना बाहेरच्या जगात मात्र माझं नश्वर शरेीर एका विशिष्ट लयेीत जेवण करेीत होतं!!! जेवण संपलं तसं 'त्या' नशेतच रूम वर परतलो आणि ठरल्याप्रमाणे अभ्यासाचा प्लॅनहेी सोइस्करपणे बाजूला सारला...फक्त आणि फक्त 'त्या' रंगेीन दुनियेत परतण्यासाठेीच!

Thursday, August 11, 2011

कुत्र्यांपासून सावध रहा!


पहिलाः 'ये,VJTI Electronics options मध्ये घालु नकोस!'.
दुसराः 'क़ा रे (त्यांचं Dept. तर COEP च्या E&TC पेक्षा चांगलं आहे ना!)?'
पहिलाः 'दादर ( मृत्यू ) जवळच आहे, त्यापेक्षा आपलं COEP बरं आहे- कोरेगाव पार्क लांब आहे..तेवढंच सेफ़! वाचलो तर वाचलो..'(हल्लेी 'वाचाल तर वाचाल' पेक्षा हेी म्हण फार रुढ झालेी आहे)'

I bet-Engineering चा Admission form भरताना हा विचार १०० पैकेी ९० मुलांनेी ( विशेषतः form भरायचेी मुदत १२ ते १४ July असते आणि १३ जुलै ला serial bomb-blasts होतात तेव्हा! ) नक्केीच केला असेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर, नोकरेीचं ठिकाण ,शिक्षणासाठेी परगाव आणि मुलिसाठेी सासर निवडताना अन्न, वस्त्र, निवारा इ. शिवाय bomb-blast त्या विशिष्ट ठिकाणेी कितेी वेळा झाले आहेत याहेी गोष्टिचा विचार जर पालकांनेी केला नाहेी तर नवलंच! Atleast यामुळे आपला पाल्य भविष्यात तिथे सुख़ेी राहण्याचं तर सोडाच, जिवंत राहण्याचेी कितपत शक्यता आहे तेवढेी कल्पना तर येइल...

असो तर मुद्दा हा आहे केी १३ जुलै ला bomb-blast झाला....कोणेी केला? कुत्र्यांनेी!(?)-हो, बरोबरच बोलतोय! कुत्र्यांनेीच केला...काय, कुत्र्यांचेी जात विचारताय---हे पहा आमच्याकडे २ जातेीचे कुत्रे आहेत...१) माणसांना मारुन ( आणि त्यांचेी हाडं ख़ाऊन ) स्वतःला जागविणारे…२)सामान्य माणसाला तडफत ठेवून ( त्यांचा पैसा ख़ाऊन ) जगणारे!...' बरं मग हेी कुत्रेी पाळतात कोण? '..आम्हेीच..ख़ायला पण आम्हेीच घालतो! ( कसं ? ) License काढणे, Passport काढणे, देवाचं दर्शन घेणे इ.साठेी आम्हेी ज्यादाचे पैसे देतो..त्यावरच हेी कुत्रेी जगतात...अशा प्रकारे आम्हेी २ नं.च्या कुत्र्यांचं पालन करतो. आणि या २ नं.च्या कुत्र्यांकडून जे काहेी उरतं ते १ नं.च्या कुत्र्यांना दिलं जातं.. .नकळत! तेी नमक हलाल कुत्रेी मग त्या उष्ट्याला जागून २ नं. च्या कुत्र्यांना त्रास देत नाहेीत...त्यामुळे मग त्यांच्या तावडेीत आम्हेी (सामान्य) सापडतो.

पण या दोन्हेी जातेी जातेीनं एकदम अस्सल! यांचेी पैदासेी हे एकमेव क्षेत्र असेल जिथे भ्रष्टाचार किंवा भेसळ यांचा साधा मागमूस नाहेीये. Public समोर एक-मेकांसोबत भांडतात पण टेबलाख़ालेी लंगोटेी मित्रांनाहेी लाजवेल एवढा एक-मेकांबद्दलचा जिव्हाळा! अशेी हेी आमचेी चाणाक्ष, नमक हलाल कुत्रेी….
'तुम्हाला त्यांच्याबद्दल एवढं कसं माहित? ( म्हणजे तुम्हेी पण त्याच जातेीचे का? )'.
मेी ( अभिमानाने )म्हणालो-' छे हो! मेी ' त्यांच्यातला ' नाहेी ( आणि ' त्यांच्या ' जातेीमध्ये जाणारहेी नाहेी ) '…

पण यामधेील एक बाब आश्वासक आहे- या विकाऊ कुत्र्यांचे मालक दुसरं-तिसरं कोणि नसून खुद्द आपण आहोत,या पिसाळलेल्या कुत्र्यांना आवर घालता येण्ं शक्य आहे.
त्यासाठेी गरज आहे मालकांनेी जागं होण्याचेी...
त्यामुळे शेवटाला म्हणावसं वाटतं- समस्त मालकहो, जागे व्हा !

टेीप्ः
१) भारत हे असं एक राष्ट्र आहे जिथे एख़ाद्याने तोंडाला चाटलं कि आपल्या ढुंगणावर लाथ ख़ाऊन घेण्याचेी पण लोकांचेी तयारेी असते!
२) विठ्ठलाकडे महाराष्ट्राच्या प्रगतेीचं साकडं घातलं जातं आणि मग राज्याचेी प्रगतेी म्हणजे काय हे पण समजतं-फक्त २ दिवसात!
-मु. पो. मुंबई
दिः १४-०७-२०११